-
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या मर्दिनी या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
-
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
-
प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अथांग समुद्राच्या मध्यभागी एका बोटीवर अतिशय बोल्ड आणि मनमोहक अंदाजात पोझ देताना दिसत आहे.
-
या खास फोटोशूटसाठी तिने गुलाबी आणि क्रीम रंगाचा स्टायलिश, नक्षीदार डीप-नेक पद्धतीचा ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिने आपले केस पाठीमागे बांधले असून वाऱ्याच्या झुळुकीमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.
-
तर दुसऱ्या फोटोत ती समुद्राच्या थंड हवेचा आनंद घेत क्षितिजाकडे अतिशय शांत आणि रोमँटिक नजरेने पाहत आहे.
-
समुद्राच्या बॅकग्राउंडमुळे प्रार्थनाचे हे फोटो प्रचंड उठून दिसत असून चाहत्यांना तिची ही अदा कमालीची आवडली आहे.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून तिच्या या हॉट आणि नॅचरल लूकवर चाहते भरभरून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक