-
तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री खुशी माळी सध्या चर्चेत आली आहे.
-
खुशीने नुकतीच उज्जैन येथील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देऊन देवाचे दर्शन घेतले.
-
या भक्तीमय प्रवासादरम्यानचे काही सुंदर आणि खास फोटो खुशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
एका फोटोमध्ये खुशी महाकाल मंदिराच्या आवारात हातात पूजेचे ताट आणि प्रसाद घेऊन हसऱ्या चेहऱ्याने उभी असल्याचे दिसत आहे.
-
या दर्शनासाठी तिने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा सुंदर फ्लोरल अनारकली ड्रेस परिधान केला असून, कपाळावर महाकालचा टिळा लावला आहे.
-
मंदिराच्या गाभाऱ्यात चाललेल्या विशेष पूजेदरम्यान खुशीने गुलाबी रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान करून मनोभावे प्रार्थना केली आहे.
-
काही फोटोंमध्ये ती कालभैरव मंदिराच्या बाहेरही अगदी साध्या आणि तितक्याच आकर्षक लूकमध्ये उभी राहून पोज देताना दिसते.
-
महादेवाच्या भक्तीत लीन झालेल्या खुशी माळीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: खुशी माळी/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक