-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत तिने विविध चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
सई ताम्हणकर सध्या बोल बोल राणी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मात्र तिने इतर मराठी चित्रपटांमध्येही उत्तम भूमिका केल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज आणि सोशल मीडिया)
-
सई ताम्हणकरने दुनियादारीत साकारलेली शिरीन प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे.
-
क्लासमेट्स या चित्रपटातले तिचे संवाद खूप गाजले होते. या चित्रपटात सईने अप्पू हे पात्र साकारलं होतं.
-
सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांचा वजनदार हा चित्रपटही लोकांच्या स्मरणात आहे.
-
फॅमिली कट्टा या चित्रपटातही सईने केलेली भूमिका स्मरणीय ठरली.
-
गर्लफ्रेंड या चित्रपटात सई ताम्हणकर आणि अमेय वाघ ही जोडी होती. यातली आलिशा अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.
-
सईचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपटही हलकाफुलका होता, यातली भूमिकाही लोकांना खूप आवडली.
-
पाँडेचरी या चित्रपटातला सईने केलेली निकिताची भूमिका ही वेगळी होती. तसंच नेहमीप्रमाणे या चित्रपटातही सई खूप सुंदर दिसली आहे.
-
धुरळा चित्रपटातील सईने साकारलेली हर्षदा या भूमिकेला गंभीर टोन होता. पण तो तिने उत्तमरित्या कॅरी केला आहे.
-
नुकताच प्रदर्शित झालेला तुंबाडची मंजुळा हा चित्रपटही लोकांना खूप आवडला. यातली सोशिक शोभा लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल.
-
गुलकंद चित्रपटाचा विशेष उल्लेख करावा लागेल. यात सईने एका २० वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका केली. पण नीता ढवळे ही भूमिका सईने खूप उठावदार पद्धतीने साकारली आहे यात शंकाच नाही.
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”