-
स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिका ‘आई कुठे काय करते’ यातून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरांत पोहोचली आहे.
-
या मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
गौरी ही एक अत्यंत गुणी आणि उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकताच गौरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोकण दौऱ्यातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये ती एका घनदाट जंगलात, लाकडी पुलावर उभी राहून सुंदर पोझ देताना दिसत आहे.
-
तिने परिधान केलेली जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग प्रिंटेड ब्लाऊज तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावत आहे.
-
या फोटोसोबत गौरीने एक अत्यंत भावनिक आणि सविस्तर कॅप्शन लिहून कोकणच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
कोकणातील जुने वाडे, शांतता आणि तिथल्या निसर्गाच्या ती पूर्णपणे प्रेमात पडल्याचे तिने म्हटले आहे.
-
गौरीने पोस्टच्या शेवटी लिहिले आहे की, “कामानिमित्त कोकणात आले… पण इथे येऊन जाणवलं, काही ठिकाणं आपण पाहत नाही, ती आपल्याला अनुभवायला मिळतात. इथल्या जुन्या वाड्यांमध्ये, शेकडो वर्ष उभ्या असलेल्या घरांमध्ये राहण्याचा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. त्या भिंतींवर काळाच्या खुणा आहेत… पण, त्याचबरोबर जपलेली माणुसकी, संस्कार आणि इतिहासही… प्रत्येक घराचं एक म्हणणं आहे, प्रत्येक अंगणात एक शांतपणा, जो खरंच शहरात कितीही शोधला तरी सापडत नाही आणि या सगळ्याच्या जोडीला मनात घर करतात ती इथली माणसं. ‘कोकणची माणसं साधी भोळी’ ही म्हण योग्य नाहीये… आणि साधी भोळी नसायलाच पाहिजे… पण ‘कोकणची माणसं प्रेमळ आणि निर्मळ’ असं म्हटले तर वावगं ठरणार नाही, कष्ट करणं हा त्यांचा स्वभाव आहे… इथली माणसं कमी बोलतात… पण प्रत्येक कृतीतून आपलेपणा व्यक्त होतो. मदत करताना अपेक्षा नसते आणि पाहुणचार करताना औपचारिकता नसते… फक्त मनापासून केलेलं स्वागत असतं. या मातीच्या, या माणसांच्या आणि या शांततेच्या मी प्रेमात पडलेय… लवकरच परत येईन…”
-
(सर्व फोटो सौजन्य: गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा