-
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharo Ghari Maatichya Chuli) ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
लवकरच मालिकेत जानकीची नणंद म्हणजेच शर्वरीचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे.
-
याच लग्नसोहळ्यासाठी रेश्मा अर्थात ‘जानकी’ने हा खास पारंपरिक लूक केला होता.
-
या सोहळ्यासाठी रेश्माने सुरेख निळ्या रंगाची पैठणी साडी आणि त्यावर आकर्षक आरी वर्क केलेला ब्लाऊज परिधान केला होता.
-
हे फोटो शेअर करत रेश्माने “आनंद, हसू, मेहंदीचा रंग आणि घरोघरी मातीच्या चुली कुटुंब” असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
डीजेबंदीवरून राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका; म्हणाले, “सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने …”