-
संजय जाधव (Sanjay Jadhav) हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि निर्माते आहेत.
-
मराठी सिनेमाला ग्लॅमर आणि एक वेगळा बाज मिळवून देण्यात संजय जाधव यांचे खूप मोठे योगदान आहे.
-
काल (१८ जुलै) संजय यांचा ५६ वा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांनी मराठी कलाकारांबरोबर एका खास पार्टीत हा आनंद साजरा केला.
-
अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता सुयश टिळक यांनी संजय यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
संजय जाधव यांनी २००८ मध्ये आलेल्या ‘चेकमेट’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘दुनियादारी’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.
-
चित्रपटांशिवाय संजय यांनी छोट्या पडद्यावरही अनेक प्रचंड लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे.
-
भव्यता, उत्तम संगीत, स्टायलिश सादरीकरण आणि मैत्रीवर असलेला विशेष भर ही संजय जाधव यांच्या चित्रपटांची मुख्य आकर्षणे मानली जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य : संजय जाधव/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा