-
झी मराठीवरील ‘तारिणी’ (Tarini) ही मालिका तिच्या वेगळ्या आणि रंजक कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
कथानकात ‘तारिणी’ आणि तिची टीम प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने तपास करत, समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करून गुन्ह्यांची उकल करताना दिसते.
-
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) ‘तारिणी’ची मुख्य भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच एक स्टायलिश फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने काळ्या रंगाचा टॉप आणि गळ्यात एक हटके नेकलेस परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना शिवानीने, “शेवटी आपण दोघे एकत्र असावे, एवढीच इच्छा…” असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवानीचे हे कॅप्शन वाचून तिची मालिकेतील सहकलाकार अभिज्ञा भावेने ‘ते आता तुझ्या हातात आहे’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा