-
दिग्दर्शक अक्षय शिंदे यांचा ‘स्वप्नसुंदरी’ (SwapnaSundari Movie) हा मराठी चित्रपट २४ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि अभिनेत्री सायली पाटील (Sayli Patil) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने भूषण आणि सायलीने एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भूषणने तपकिरी रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे, तर सायली पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
या चित्रपटात भूषण ‘राघव’ तर सायली ‘मानसी’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
-
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अक्षय शिंदे म्हणाले, “आजच्या तरुणाईसाठी लग्नाचा निर्णय आणि योग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा विषय बनला आहे.”
-
“हीच गोष्ट आम्ही ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटाच्या माध्यमातून हलक्या-फुलक्या, विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : भूषण प्रधान/इन्स्टाग्राम)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय