-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दीपा चौधरीने (Deepa Chaudhari) आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या खास फोटोशूटसाठी दीपाने केशरी रंगाची आकर्षक हॅन्डपेंटेड साडी नेसली आहे.
-
दीपाच्या या साडीवर “काया ही पंढरी… आत्मा हा विठ्ठल…!” या भक्तिमय ओळी सुरेख अक्षरांत रेखाटल्या आहेत.
-
आषाढी एकादशी म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती पंढरपूरची शिस्तबद्ध वारी.
-
आषाढी एकादशी हा सण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
-
या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून लाखो वारकरी व भाविक विठूमाऊलीच्या नामाचा गजर करत पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.
-
दरम्यान, दीपा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुना येती घरा’ या नवीन मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा चौधरी/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ