-
मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा या लोकप्रिय मालिकेत रमा ही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
शिवानीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एका सुंदर फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा लूक लक्षवेधी आहे.
-
या फोटोमध्ये शिवानीने जांभळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला भारी चोली-लेहेंगा परिधान केला आहे.
-
जांभळ्या लेहेंग्यावर तिने रॉयल निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला असून, ब्लाऊजच्या मागच्या बाजूचे डिझाईन आणि सुंदर लटकन अतिशय आकर्षक दिसत आहेत.
-
दागिन्यांबद्दल बोलायचे तर, तिने कुंदन आणि मोत्यांच्या पारंपरिक चोकर नेकलेसने स्वतःला सजवले आहे.
-
गळ्यातील हाराव्यतिरिक्त तिने मॅचिंग कुंदन झुमके, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आणि नथ घालून तिचा पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
शिवानीची हेअरस्टाईलदेखील तितकीच खास आहे. तिने समोरून साधी पफ घेऊन मागे सुंदर लांब, अशी फिशटेल वेणी घातली आहे.
-
तिचे हे नवीन फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते तिच्या या लूकवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ