-
‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाणची पत्नी संजना चव्हाण सध्या तिच्या खास मॅटर्निटी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे.
-
या खास फोटोशूटसाठी संजनाने निळ्या रंगाची अत्यंत सुंदर आणि आकर्षक काठपदराची साडी परिधान केली आहे.
-
संजनाचा हा पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यातसोन्याचा भरगच्च हार, नाकात नाजूक नथ आणि कानात सुंदर झुमके घातले आहेत.
-
तिच्या हेअरस्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, तिने केस अत्यंत आकर्षक पद्धतीने बांधले आहेत.
-
हातात घातलेली मोठी गोल अंगठी आणि मेंदीची नाजूक नक्षी यांमुळे तिच्या हातांचे सौंदर्य अधिकच मोहक दिसत आहे.
-
या सर्व फोटोंमध्ये संजना एखाद्या राजेशाही घराण्यातील महाराणीसारखी दिसत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट होताच तुफान व्हायरल झाले असून, चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सूरज चव्हाणच्या चाहत्यांनी संजनाच्या या नव्या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: संजना चव्हाण/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा