-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट (Jennifer Winget) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
जेनिफरने तिच्या खास लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
४१ वर्षांच्या जेनिफरने सिंगापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक विल्यम इश्माएलशी (William Ishmael) यूकेमध्ये लग्नगाठ बांधली.
-
लग्नासाठी जेनिफरने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता, तर विल्यमने निळ्या रंगाचा ब्लेझर सूट घातला होता.
-
विल्यम हा ‘एमएचसी डिजिटल ग्रुप’मध्ये ‘डायरेक्टर ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट अँड ट्रेडिंग’ म्हणून कार्यरत आहे. त्याने ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’मधून अर्थशास्त्र आणि फायनान्सचे शिक्षण घेतले आहे.
-
विल्यमने आपल्या करिअरची सुरुवात ‘युबीएस इन्व्हेस्टमेंट बँक’मधून केली. त्यानंतर त्याने फायनान्स, परकीय चलन आणि स्ट्रॅटेजिक ग्रोथ या क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर जेनिफर आणि विल्यमवर चाहते आणि कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
जेनिफर विंगेट आणि विल्यम इश्माएल यांनी आपलं नातं खासगी ठेवलं होतं. (सर्व फोटो सौजन्य : जेनिफर विंगेट/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा