-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर २६ मे रोजी जुळ्या मुलांचे आई-बाबा झालेल्या दिव्यांका आणि विवेकने मुलांचा नामकरण सोहळा नुकताच पार पाडला आहे.
-
‘ये है मोहब्बतें’ मालिकेमध्ये दिव्यांकाच्या लेकीची म्हणजेच ‘रुही’ची भूमिका साकारणारी बालकलाकार रुहानिका धवन ही दिव्यांकाच्या जुळ्या बाळांना भेटायला तिच्या घरी पोहोचली होती.
-
बाळांना भेटायला गेलेल्या रुहानिकाने दिव्यांका, विवेक आणि त्यांच्या चिमुकल्यांसोबतचे काही अतिशय खास आणि प्रेमळ फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुहानिका दिव्यांकाच्या जुळ्या बाळाला अतिशय मायेने आणि प्रेमाने आपल्या कडेवर घेत हातावर सांभाळताना दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोमध्ये दिव्यांका, विवेक व रुहानिका एकत्र बसले असून, दोघांच्या हातात त्यांची जुळी बाळे दिसत आहेत.
-
हे फोटो शेअर करीत रुहानिकाने “तिच्या छोट्या मुलीची भूमिका साकारण्यापासून, ते माझ्या ईशिमाच्या बाळांना हातात घेण्यापर्यंत… आयुष्य खरोखरच पूर्ण वर्तुळाकार पूर्ण झाले आहे,” अशी भावूक पोस्ट लिहिली आहे.
-
पुढे तिने गमतीने लिहिले, “मला वाटतं की, आता मी अधिकृतपणे सांगू शकते की, तिच्या आयुष्यात आता तीन लहान मुलं आली आहेत आणि या जुळ्या बाळांना यापेक्षा कूल पालक मिळूच शकले नसते.”
-
ये है मोहब्बतें या प्रसिद्ध मालिकेत दिव्यांकाने ‘ईशिता’ (ईशिमा), तर रुहानिकाने तिच्या रुही या लाडक्या मुलीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. (सर्व फोटो सौजन्य: दिव्यांका त्रिपाठी आणि रुहानिका धवन/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा