-
सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे.
-
दर्जेदार विनोद, कलाकारांचं अफलातून सादरीकरण आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळलेली नाळ, यामुळे हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय ठरला आहे.
-
याच कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री चेतना भट (Chetana Bhat) गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच चेतनाने गोव्याची एक सुंदर सफर केली होती.
-
सुंदर समुद्रकिनारे आणि अनोख्या संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात चेतनाने एक हटके फोटोशूट केलं आहे.
-
या खास फोटोशूटसाठी चेतनाने गुलाबी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
चेतनाच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक