-
चिप्सचे पाकीट अर्धे रिकामे दिसल्यामुळे कंपन्या ग्राहकांना फसवतात असा गैरसमज असतो, परंतु त्यामागे मार्केटिंग नसून वैज्ञानिक कारणे आहेत. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
चिप्सच्या पाकिटात सामान्य हवा नसून सुमारे ७८% वातावरणात आढळणारा रंगहीन आणि वासहीन नायट्रोजन वायू भरला जातो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
हवेतील ऑक्सिजनमुळे तळलेल्या चिप्समधील तेलाचे ऑक्सिडीकरण होऊन चिप्सचा कुरकुरीतपणा आणि ताजी चव निघून जाते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
वाहतुकीदरम्यान लागणारे धक्का आणि दाब यांपासून नाजूक चिप्सचा चुरा होऊ नये म्हणून ही पोकळी संरक्षणात्मक उशीसारखी मदत करते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
विशेष पॅकेजिंग आणि नायट्रोजनमुळे पाकिटात ओलावा किंवा ऑक्सिजन शिरू शकत नाही, ज्यामुळे चिप्स अनेक दिवस ताजे राहतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पाकिटाचा आकार लहान केल्यास आतील संरक्षण कमी होईल आणि ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत चिप्सचा पूर्णपणे चुरा होईल. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पॅकेटवर निव्वळ वजन (Net Weight) स्पष्टपणे लिहिलेले असते, त्यामुळे ग्राहक वस्तूच्या वजनाचेच पैसे देतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
कायद्यानुसार अन्नाचे संरक्षण आणि ताजेपणा टिकवण्यासाठी सोडलेल्या या मोकळ्या जागेला ‘फंक्शनल स्लॅक फिल’ म्हटले जाते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय