-
दरवर्षी पावसाचे आगमन होताच भारतातील विविध निसर्गरम्य प्रदेश एका वेगळ्याच प्रकाशोत्सवात न्हाऊन निघतात. हजारो काजव्यांच्या लखलखाटामुळे जंगल, डोंगर आणि गवताळ प्रदेशात एक नयनरम्य व जादूई वातावरण तयार होते.
-
निसर्गाचा हा अद्वितीय रोषणाई सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी जगभरातून निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करत आहेत.
-
प्रमुख पर्यटन स्थळे
पुरुषवाडी, महाराष्ट्र : पावसाळ्यापूर्वी पुरुषवाडीच्या सभोवतालच्या जंगलात हजारो काजवे एकत्र येत असल्याने हे ठिकाण काजव्यांच्या उत्सवासाठी देशात सर्वाधिक प्रसिद्ध मानले जाते. -
कूर्ग, कर्नाटक
कॉफीच्या बागा आणि धुक्याची दुलई पांघरलेल्या कूर्गमध्ये पावसाच्या सुरुवातीला शांत वनक्षेत्र आणि शेतात काजव्यांचा मनमोहक प्रकाश पाहायला मिळतो. -
भीमाशंकर अभयारण्य, महाराष्ट्र
घनदाट जंगले आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या भीमाशंकरमध्ये पावसाळ्यापूर्वी झाडांवर हजारो काजवे चमचमताना दिसतात. -
आनामलाई व्याघ्र प्रकल्प, तमिळनाडू
दक्षिण भारतातील या समृद्ध जंगलात योग्य ऋतूत संध्याकाळनंतर संपूर्ण निसर्ग परिसर काजव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. -
राजमाची, महाराष्ट्र
लोणावळा व कर्जतदरम्यानच्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या राजमाचीमध्ये पदभ्रमण मार्गांवर जंगलात काजव्यांचा अतिशय नयनरम्य प्रकाश सोहळा पाहायला मिळतो. -
टाटामारी पर्यावरण पर्यटन केंद्र
छत्तीसगडच्या शांत जंगल परिसरात वसलेल्या टाटामारी केंद्रात संध्याकाळ होताच हजारो काजवे चमकू लागतात, ज्यामुळे निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय