-
प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ (Mamachya Govyala Jauya Movie) येत्या ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
“गोवा ट्रिप” हा कोणत्याही फ्रेंड सर्कलच्या गप्पांमधला सर्वात आवडीचा आणि हमखास येणारा विषय आहे.
-
या चित्रपटाच्या नावावरूनच यामध्ये मैत्री, गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधील मोकळेपणा यांचा एक भन्नाट मेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होते.
-
या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
-
नुकतेच रुचिराने समुद्रकिनारी केलेले एक खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
यामध्ये रुचिराने ऑफ-शोल्डर प्रिंटेड टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला असून तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
विशेष म्हणजे, ‘फ्रेंडशिप डे’च्या (Friendship Day 2026) आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तरुण प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम)
काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; ६ राज्यांचे प्रभारी बदलले, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी ‘या’ बड्या नेत्याची वर्णी