-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आपल्या उत्कृष्ट अभिनयशैलीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करते.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी शिवाली नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करीत असते.
-
नुकतेच शिवालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पारंपरिक वेशातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने फिकट गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी नेसून, अत्यंत देखणा आणि नजाकतदार लूक साकारला आहे.
-
साडीला साजेसे दागिने, नाकात नथ आणि केसांत गजरा माळलेली शिवाली या पारंपरिक अवतारात अतिशय मोहक दिसत आहे.
-
निसर्गरम्य पार्श्वभूमीवर दिलेल्या या फोटोंमध्ये तिचे सुंदर हास्य आणि दिलखेचक पोजेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
तिने या खास फोटोशूटच्या पोस्टला ‘Gulabi’ अशी कॅप्शन दिली असून, तिची हे कॅप्शन तिच्या लूकला अगदी साजेशी ठरत आहे.
-
चाहते आणि नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्या सौंदर्याचे आणि मराठमोळ्या लूकचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवाली परब/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ