-
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या खास प्रसंगी रेश्मा शिंदे हिने पारंपरिक जांभळ्या आणि लाल रंगाच्या साडीतील अतिशय सुंदर आणि सात्त्विक लूकमधील फोटो शेअर केले.
-
अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर नतमस्तक होतानाचा भावूक फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
फोटो शेअर करीत तिने ‘तुझ्या आशीर्वादाची जाणीव झाली की, तक्रारी आपोआप कमी होतात. सदैव ऋणी आहे… अशीच कृपा असू दे’ अशी भावनिक कॅप्शन दिली आहे.
-
रेश्माची ही स्वामीभक्ती आणि तिची पोस्ट पाहून तिचे चाहते भारावून गेले असून, तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरातील या फोटोंमध्ये रेश्माच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि प्रसन्नता स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील रेश्माच्या जानकी या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
अभिजीत दिपकेंचं रामदेवबाबांना उत्तर; “आम्ही देशाकडे लक्ष देतो, तुम्ही पतंजलीच्या उत्पादनांकडे पाहा, त्यात..”