-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी उत्तम अभिनयासोबतच एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते.
-
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतेच वैदेहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसाठी काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून, साडीच्या लाल काठ-पदरावर पारंपरिक सोनेरी नक्षीकाम आहे.
-
जांभळ्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केल्यामुळे ही रंगसंगती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
गळ्यात हार, कानात झुमके आणि नाकात नथ अशा पारंपरिक दागिन्यांमुळे तिचे मराठमोळ्या अंदाजातील रूप अधिक खुलले आहे.
-
कपाळावर चंद्रकोर आणि केसांच्या अंबाड्यावर माळलेला गजरा तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
तिने या फोटोंना ‘Grateful & how!’ अशी कॅप्शन दिली असून, चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कौतुकसुमनांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ