-
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या दोघी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचल्या.
-
या दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून, त्या एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असतात.
-
वल्लरी आणि आलापिनीने नुकतेच पारंपरिक पोशाखात केलेले फोटोशूट सध्या खूप चर्चेत आले आहे.
-
या फोटोंमध्ये वल्लरीने जांभळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे; तर आलापिनीने तसाच, पण गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे.
-
दोघींनीही केसांची वेणी घालून, त्यावर गजरा माळला आहे, तसेच कपाळावर टिकली आणि हलका मेकअप करून हा लूक पूर्ण केला आहे.
-
वल्लरी सध्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेत श्रावणी ही मुख्य भूमिका साकारत असून, ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
आलापिनीदेखील आनंदी या मालिकेत काम करीत असून, प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)
“मला सतत खोकला येत होता”, प्राजक्ता माळीचा वाढदिवशी मोठा निर्णय; म्हणाली, “मर्जीने नाही तर सक्तीने…”