-
मायरा वायकुळ (Myra Vaikul) ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय बालकलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या गाजलेल्या मालिकेत मायराने साकारलेली ‘परी’ ही भूमिका घरोघरी पोहोचली आणि तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
मायराने ‘नाच गं घुमा’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ आणि ‘मर्दिनी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
सध्या मायरा आपल्या कुटुंबाबरोबर गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
गोवा हे भारतातील निसर्गरम्य आणि क्षेत्रफळाने सर्वात छोटे राज्य मानले जाते.
-
गोव्यातील ट्रिपचे काही सुंदर फोटो मायराची आई श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मायरा तिचे आई-वडील (गौरव वायकुळ) आणि लहान भाऊ (व्योम वायकुळ) यांच्याबरोबर छान पोज देताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच