-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री शिवाली परब आपल्या उत्तम विनोदी अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत असते.
-
शिवाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती सतत तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करीत असते.
-
नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गुलाबी रंगाच्या साडीतील काही सुंदर फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत.
-
या साडीवर तिने परिधान केलेल्या गडद हिरव्या रंगाच्या स्लीव्हलेस ब्लाऊजमुळे तिचा हा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.
-
शिवालीच्या या साध्या, पण अत्यंत सुंदर गुलाबी साडीतील मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.
-
एका हातात घातलेल्या काचेच्या हिरव्या बांगड्यांमुळे तिच्या या लूकला एक छान पारंपरिक स्पर्श मिळाला आहे.
-
साधे, मोजके दागिने आणि मोकळ्या केसांची सुंदर रचना तिच्या या लूकला अधिकच परिपूर्ण बनवते. नैसर्गिक मेकअप आणि नाकातील नाजूक चमकी यांमुळे तिचा हा लूक अतिशय टवटवीत आणि मनमोहक दिसत आहे.
-
आपल्या या खास फोटोंना तिने ‘A rose’ अशीकॅप्शन दिली आहे. या नवीन फोटोशूटमधील तिच्या खास अदांवर सध्या चाहत्यांकडून भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवाली परब/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ