-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे.
-
त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच आपले काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्यांनी परिधान केलेल्या फिकट हिरव्या रंगाच्या आणि सुंदर हॉल्टर नेक प्रिंटेड कुर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
कपाळावर लावलेली छोटी टिकली आणि चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या या लूकला अजूनच खास बनवत आहे.
-
लांबसडक मोकळे केस आणि नैसर्गिक मेकअप यांमुळे त्यांचा हा वेस्टर्न-एथनिक लूक अत्यंत फ्रेश वाटत आहे.
-
या फोटोंमधील त्यांची मनमोहक अदा आणि कॅमेऱ्यापुढील सहज वावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
चाहते आणि नेटकरी त्यांच्या या नव्या लूक आणि फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच