-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
घर म्हटलं की छोट्या-मोठ्या कुरबुरी आल्याच; पण या घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते त्यात राहणाऱ्या आपल्या माणसांमुळे! याच आपल्या माणसांची आपुलकीची गोष्ट म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’.
-
या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) ‘शर्वरी’ ही भूमिका साकारत आहे.
-
सध्या मालिकेत शर्वरीच्या लग्नाचा विशेष भाग दाखवला जात असून, या निमित्ताने धनश्रीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये धनश्रीने सुंदर गुलाबी रंगाची सिल्क साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला साजेसे कानातले, गळ्यातील नेकलेस आणि हातात हिरवा चुडा असा पारंपरिक साज धनश्रीने केला आहे.
-
धनश्रीची ही मालिका एका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच