-
बिग बॉस मराठी फेम विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण लवकरच आई-बाबा होणार आहेत.
-
या खास आनंदाच्या प्रसंगी त्यांनी नुकतेच आई मरी मातेच्या मंदिरात जाऊन तिचे भावुकतेने दर्शन घेतले.
-
या दर्शनादरम्यान सूरजने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली असून तो खूप उत्साही दिसत होता.
-
त्याच्या शर्टवर आई मरी मातेचे चित्र आणि मागे एक भावूक मराठी संदेश छापलेला असल्याने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
-
त्याची पत्नी संजना चव्हाणने पारंपरिक जांभळ्या रंगाची सुंदर साडी आणि गळ्यात मंगळसूत्र परिधान करून लक्ष वेधून घेतले होते.
-
संजनाच्या ब्लाऊजवर मागे देवीच्या रूपाचे एक अत्यंत देखणे आणि कलात्मक डिझाइन साकारण्यात आले होते.
-
हे जोडपे मंदिरात हातात हात घालून देवीसमोर अत्यंत श्रद्धेने नतमस्तक झाले आणि नव्या प्रवासासाठी आशीर्वाद घेतले.
-
‘आई देवीच्या दर्शनाने मनाला मिळाला शांततेचा स्पर्श… संकटं कितीही मोठी असली तरी आईचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो… जय आई मरी माता..’ असे लिहित त्यांनी सोशल मीडियावर ही सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: संजना चव्हाण/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप कंपनीत द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा