-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व स्टायलिश अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
प्राजक्ता माळीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कुलदेवतेच्या दर्शनाची एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये प्राजक्ताने आपली कुलदेवता असलेल्या ‘आई तुळजाभवानी’चे दर्शन घेतल्याचे आवर्जून सांगितले आहे.
-
सालाबादप्रमाणे या वर्षीही वाढदिवसाच्या महिन्यात प्रवेश करण्यापूर्वी कुलदेवतेचे दर्शन घेणे हा तिच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे.
-
आपल्या वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात करण्यापूर्वी तिने आवर्जून आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आहेत.
-
यावेळी प्राजक्ताने अत्यंत साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून, तिचा हा लूक खूपच मोहक दिसत आहे.
-
दर्शनादरम्यान तिने कुलदेवतेच्या गाभाऱ्यात हात जोडून अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना केल्याचे फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.
-
या फोटोंना तिने ‘सालाबादप्रमाणे… कुलदेवी- आई तुळजाभवानीचं दर्शन. माझ्या वाढदिवसाच्या महिन्यात प्रवेश करण्यापूर्वी हे करणं अत्यंत आवश्यक गोष्टींपैकी एक आहे,’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच