-
‘मुरांबा’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेऊन संपली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने रमा ही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
नुकतेच हेअर आर्टिस्ट प्रिया चौहान यांनी शिवानी मुंढेकरचे काही अत्यंत आकर्षक आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने लाल रंगाची जरीकाम केलेली अत्यंत सुंदर भरजरी साडी परिधान केल्याचे दिसत आहे.
-
या पारंपरिक साडीवर तिने घातलेले सोन्याचे दागिने, गळ्यात चोकर आणि नाकात नथ तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
तिने हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हातावर काढलेली सुबक मेंदी तिच्या या मराठमोळ्या लूकला पूर्णत्व देते.
-
तिच्या केसांची सुंदर स्टाईल आणि मोकळे सोडलेले कुरळे केस तिच्या लूकला अधिकच आकर्षक बनवीत आहेत.
-
शिवानीचा हा साधा, पण अत्यंत मनमोहक साडी लूक पाहून तिचे चाहते आणि नेटिझन्स तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा