-
नुकतीच प्रदर्शित झालेली ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज चर्चेचा विषय बनली असून, चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडताना दिसत आहे.
-
या वेब सीरिजमध्ये चंदर, सुधा व प्रीती अशी पात्रे असून, प्रीतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा मकवाना ही खूपच चर्चेत आली आहे.
-
महिमाचे महाराष्ट्राशी खूप जवळचे नाते आहे. तिची आई महाराष्ट्रीयन असून, ती मुंबईतील दहिसर या परिसरात वाढली आहे.
-
‘राजश्री मराठी’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचे आणि महाराष्ट्राचे असलेले नाते सांगितले. तिची आई मराठी असल्याने ती या महाराष्ट्रीयन संस्कृतीशी खूप जोडली गेलेली आहे.
-
मुलाखतीत ती म्हणाली, “मराठीशी खूप मोठे नाते आहे. माझी आई महाराष्ट्रीयन आहे, मी ज्या भागात राहायचे, त्याचे मच्छी मार्केट, असे नाव होते. त्यामुळे सगळे मराठी वातावरण होते; माझे मूळ महाराष्ट्रीयन आहे. फक्त माझे नाव महिमा मकवाना आहे आणि मी लहानपणापासूनच मराठी संस्कृतीशी जोडली गेलेली आहे.”
-
आईची इच्छा सांगत ती पुढे म्हणाली, “माझ्या आईची इच्छा अशी होती की, माझ्या करिअरची सुरुवात मराठी इंडस्ट्रीमधून व्हावी.”
-
तिने घरातही मराठीतच बोलत असल्याचे स्पष्ट केले. ती म्हणाली, “आम्ही सगळे घरी मराठीतच बोलतो. तसेच आमची संस्कृती मराठीच आहे. जेवणापासून आमचे पूर्ण संगोपन सगळे महाराष्ट्रीयनच आहे.”
-
महिमा मकवानाच्या ‘मुसाफिर कॅफे’मधील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेब सीरिजमधील तिची भावनिक भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: महिमा मकवाना/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ