-
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
या मालिकेत महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री अमृता धोंगडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
-
अमृताने शेअर केलेले तिचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने मोत्यांची सुरेख रचना असलेला पांढऱ्या रंगाचा स्टायलिश टॉप आणि फिकट निळी जीन्स असा आऊटफिट परिधान केला आहे.
-
मोकळे सोडलेले कुरळे केस, चेहऱ्यावरील सुंदर ग्लॅम मेकअप आणि लिपस्टिक तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवीत आहे.
-
तिच्या मनगटावरील सूर्य-चंद्राचे टॅटू, सोन्याचे कडे आणि दुसऱ्या हातातील मोत्यांचे ब्रेसलेट तिच्या या लूकची शोभा वाढवत आहे.
-
नाकातील नाजूक चमकी आणि चेहऱ्यावरील गोड स्मिताने तिच्या या मनमोहक लूकला परिपूर्णता मिळवून दिली आहे.
-
अमृताचे हे ग्लॅमरस रूप पाहून, तिचे चाहते या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ