-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असून, नवनवीन फोटोंद्वारे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
नुकतीच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर राजस्थानची प्रसिद्ध गुलाबी नगरी असलेल्या जयपूर येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेली आहे.
-
जयपूरच्या या ट्रिपदरम्यान तिने आपल्या खास मैत्रिणीसोबत शहरात फिरतानाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये वैष्णवीने पाश्चिमात्य आणि राजस्थानी एथनिक लूकचा एक उत्तम फ्युजन मेळ साधल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तिने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस क्रॉप टॉप, रंगीबेरंगी डिझाईन असणारा घेरेदार स्कर्ट आणि चेकची ओढणी, असा अत्यंत आकर्षक पोशाख परिधान केला आहे.
-
ऐतिहासिक वास्तूंच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये फूल माळून, तिने दिलेल्या पोज चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
एका फोटोमध्ये ती ऐतिहासिक वास्तूच्या जुन्या लाकडी दरवाजासमोर मैत्रिणीसोबत ट्युनिंग करीत सुरेख पोज देताना दिसत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करताना तिने त्याला ‘Welcome to Jaipur’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
जंतर-मंतरवर पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीनं मागितली माफी; म्हणाली, ‘मी फक्त १५ वर्षांची आहे’