-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अंबिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक अतिशय खास आणि कलात्मक साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
-
या नव्या फोटोंमध्ये प्रतीक्षाने परिधान केलेल्या गडद निळ्या रंगाच्या रेशमी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या साडीला असलेली सोनेरी अन् तांबूस रंगाचा काठ तिच्या या लूकला एक वेगळाच राजेशाही साज प्रदान करीत आहे.
-
अतिशय कल्पकतेने ड्रेप केलेली ही साडी तिने ब्लाऊजशिवाय परिधान करून, या फोटोशूटला एक प्रयोगशील लूक दिला आहे.
-
कपाळावर नाजूक लाल टिकली, नाकातील नथ, कानातील डूल तिच्या सौंदर्याला अधिकच मराठमोळा स्पर्श देतो.
-
प्रतीक्षाचा हा सुंदर आणि अनोखा अवतार पाहून चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रतीक्षा शिवणकर/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ