-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
माधवीने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील तिची ‘शालिनी’ ही भूमिका प्रचंड गाजली होती.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
-
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या आणि गडद गुलाबी रंगाची आकर्षक साडी परिधान केली आहे.
-
या फोटोंना तिने ‘When I want to eat strawberry … I pick this saree’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
तिचे हे कॅप्शन आणि फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
-
अशा प्रकारे माधवी पुन्हा एकदा तिच्या खास फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”