-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेची (Hruta Durgule) नवी वेब सीरिज ‘अगं आई अहो आई’ ही २४ जुलै रोजी ‘झी ५’ (ZEE5) वर प्रदर्शित झाली आहे.
-
वरुण नार्वेकर दिग्दर्शित या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या सीरिजमध्ये ऋताबरोबरच अभिनेत्री निर्मिती सावंत, रेणुका शहाणे आणि अभिनेता सुयोग गोऱ्हे मुख्य भूमिकेत आहेत.
-
नुकतेच ऋताने या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यानचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना ऋताने लिहिले, “आमच्या या नवीन मालिकेला मिळालेला प्रतिसाद पाहून आमचे मन आनंद आणि कृतज्ञतेने भरून आले आहे.”
-
‘अगं आई, अहो आई’ या वेब सीरिजची मूळ कथा संकल्पना कल्याणी पंडित यांची आहे.
-
नव्या कुटुंबात स्वतःचे स्थान शोधणाऱ्या एका नवविवाहित तरुणीचा प्रवास या सीरिजमध्ये अतिशय सुरेखपणे मांडण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम