-
सोनी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) आता अधिक धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
हा कार्यक्रम दर आठवड्याला प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करत त्यांना खळखळून हसवतो.
-
या कार्यक्रमातील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) सध्या तिच्या खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
रसिकाने नुकतेच गुलाबी रंगाच्या देखण्या पैठणी साडीत एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या पारंपरिक पैठणी लूकवर रसिकाने परिधान केलेल्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात आणखीच भर घातली आहे.
-
हे फोटो शेअर करत रसिकाने “सुकून अक्सर एक सच्ची हँसी में मिल जाता है” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
रसिकाच्या या फोटोंवर अभिनेत्री वनिता खरात आणि ऋतुजा बागवे यांच्यासह अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका वेंगुर्लेकर/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम