-
दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ (Aata Thambvaicha Kasa Marathi Natak) या नव्या कोऱ्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
हे नाटक प्रेक्षकांना खळाळून हसवणारं, अंतर्मुख करणारं आणि मनात घर करून राहणारा एक सुंदर अनुभव देणारं आहे.
-
एक अशी कथा जी विचार करायला भाग पाडते आणि पडदा पडल्यानंतरही दीर्घकाळ आठवणीत राहते.
-
या नाटकात लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
-
ऐश्वर्याबरोबरच या नाटकात ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि सुकन्या मोने यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या एका खास साडीतील लूकची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पेस्टल गुलाबी रंगाच्या बनारसी साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
या बनारसी साडीबरोबर ऐश्वर्याने परिधान केलेला आकर्षक हार, नाजूक कानातले आणि बांगड्या तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक