-
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले (Girija Oak-Godbole) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
गिरीजाने नुकतेच तिचा मुलगा कबीर गोडबोले (Kabir Godbole) याच्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना गिरिजाने, “जुलै महिना जवळजवळ अगदी छान गेला…” असं सुंदर कॅप्शन दिलं आहे.
-
गिरीजाने २०११ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सुहृद गोडबोले (Suhrud Godbole) याच्याशी लग्नगाठ बांधली.
-
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक (Girish Oak) हे गिरीजाचे वडील आहेत.
-
मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक व निर्माते श्रीरंग गोडबोले (Shrirang Godbole) हे गिरिजाचे सासरे आहेत.
-
गिरीजाचे माहेर आणि सासर, दोन्ही कुटुंबे मराठी कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठित आणि सक्रिय मानली जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा ओक/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ