-
मराठी मनोरंजन विश्वात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णी ही सध्या ‘शंकर जयकिशन’ या गाजणाऱ्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
अभिनयासोबतच सोशल मीडियावरही शिवानी प्रचंड सक्रिय असून, ती सतत तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करीत असते.
-
नुकतेच शिवानीने सोशल मीडियावर काही अत्यंत सुंदर आणि आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने पांढऱ्या रंगाचा एक सुंदर फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला असून, त्यात ती खूपच गोड दिसत आहे.
-
तिने कानामध्ये नाजूक इअररिंग्स घातले असून, हातात एक सुरेख अंगठी परिधान करून तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे फूल माळून केलेली हाफ-अप केशरचना (Hairstyle) आणि तिच्या हातावर असलेले टॅटू तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत.
-
अगदी कमी मेकअपनिशी कॅमेऱ्यासमोर दिलेली तिची क्यूट आणि स्मित करीत दिलेली पोज चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
-
शिवानीचा हा नॅचरल आणि एलिगंट लूक तिच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला असून, कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ