-
लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमये आपल्या साध्या आणि सुंदर अंदाजासाठी प्रेक्षकांच्या पसंतीत नेहमीच अव्वल असते.
-
मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयाने आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिने अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तिने नुकताच सोशल मीडियावर एक नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा अतिशय स्टायलिश आणि आकर्षक लूक पाहायला मिळत आहे.
-
या नवीन फोटोंमध्ये भाग्यश्रीने सुंदर असा निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला हॉल्टर नेक कुर्ता आणि जीन्स परिधान केली आहे.
-
विशेष म्हणजे भाग्यश्रीने आताच तिचे केस कापले असून, तिची ही नवीन हेअरस्टाईल तिच्या या लूकला अधिकच खुलवून दिसत आहे.
-
तिच्या या शॉर्ट हेअरस्टाईलवर आणि एकूणच सौंदर्यावर चाहते फिदा झाले असून, तिच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
आपल्या या पोस्टमध्ये तिने ‘Currently in pajamas, posting dressed up pictures!’ अशी मजेदार कॅप्शन दिली आहे.
-
भाग्यश्रीचा हा हटके अंदाज आणि तिची ही कॅप्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री लिमये/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ