-
झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla) या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) आणि आलापिनी निसळ (Aalapini Nisal) घराघरात पोहोचल्या.
-
नुकतेच वल्लरी आणि आलापिनीने एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दोघींनीही पारंपरिक चेक्स ड्रेस परिधान करत सुंदर ट्विनिंग केले आहे.
-
या फोटो शेअर करत त्यांनी दिलेलं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी लिहिलं आहे “मित्र महासागराच्या लाटांसारखे येतात आणि जातात, पण काही मात्र चेहऱ्याला चिकटलेल्या ऑक्टोपससारखे कायम सोबतच राहतात.”
-
वल्लरी आणि आलापिनीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
वल्लरी आणि आलापिनी या केवळ उत्तम अभिनेत्रीच नाहीत, तर आपल्या भन्नाट डान्ससाठीही ओळखल्या जातात.
-
सध्या वल्लरी झी मराठीवरील ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani) मालिकेत, तर आलापिनी स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ (Anandi) मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक