-
झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ (Sanai Chaughade TV Serial) ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री जुई गोगरी (Jui Gogri) ‘आसावरी’ ही भूमिका साकारत आहे.
-
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर जुईने मालिकेतील इतर कलाकारांसह ‘मुंबईच्या राजा’च्या पाद्यपूजन सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली येथील ‘मुंबईच्या राजा’चे (Mumbaicha Raja 2026) हे ९९ वे वर्ष आहे.
-
यंदा गणेशगल्लीत वैष्णव संप्रदायाचे दर्शन घडवणारी “वारी चुकायाची नाही, देवा माय-बापा तुझी वारी चुकायाची नाही… राम कृष्ण हरी!” ही थीम साकारली जाणार आहे.
-
या पाद्यपूजन सोहळ्यासाठी जुईने निळ्या रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली होती.
-
या निळ्या साडीतील लूकवर जुईने मोत्यांचे आकर्षक दागिने परिधान करून आपला लूक पूर्ण केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गोगरी/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ