-
मराठी मालिकेतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते.
-
‘सावळ्याची जणू सावली’ या लोकप्रिय मालिकेत काम करत असताना तिच्या अभिनयाचे आणि भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.
-
नुकतीच तिने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली असून त्यात तिचे निसर्गरम्य ठिकाणचे फोटो पाहायला मिळत आहेत.
-
या फोटोंमध्ये ती कोंडेश्वर मंदिर व धबधबा (Kondeshwar Temple & Waterfalls) या प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणी फिरायला गेल्याचे दिसत आहे.
-
या खास ट्रिपदरम्यान तिने कॅज्युअल टी-शर्ट, निळी जीन्स आणि स्लिंग बॅग असा एकदम साधा पण स्टायलिश लूक परिधान केला आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आपल्या जवळच्या मैत्रिणींसोबत निसर्गरम्य वातावरणाचा आणि पावसाळी हवेचा आनंद घेताना दिसतेय.
-
या सुंदर फोटोंना तिने ‘Happiness Is All About Enjoying Little Things In Life ॐ नमः शिवाय’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा सिंपल लूक आणि पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद घेण्याचा अंदाज सध्या तिच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वीणा जगताप/इन्स्टाग्राम)
सिग्नलवरील भिकाऱ्यांचे भयानक ‘सत्य’ उघड! ‘हा’ व्हायरल VIDEO पाहून पुन्हा भीक देण्याआधी १००० वेळा विचार कराल