-
Sharvari Kulkarni Borkar Black Saree Look: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर सध्या तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
शर्वरीने अनेक लोकप्रिय मालिका, नाटके आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
नुकतेच शर्वरीने एक सुंदर साडी फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी शर्वरीने आकर्षक काळ्या रंगाची कॉटन साडी आणि त्यावर सुंदर रंगीबेरंगी ब्लाऊज परिधान केला आहे.
-
आपला हा पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी शर्वरीने गळ्यात नाजूक मोत्यांचा हार, शोभून दिसणारे कानातले, मंगळसूत्र आणि हातात बांगड्या असा साज शृंगार केला आहे.
-
शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या एका चाहतीने कमेंट करत लिहिले आहे, “चंद्रकळा रुक्मिणी नेसली, पाहता दर्पणी का हसली.”
-
शर्वरी ही मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची मुलगी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
“मला नाना नकोसे वाटतात, त्यांची वाईट बाजू मी पाहिली आहे”; डिंपल कपाडिया यांचे नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य