-
सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान व अष्टपैलू अभिनेत्री आहे.
-
सोनालीने मराठी, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
अभिनयाबरोबरच सोनाली एक उत्तम लेखिकादेखील आहे.
-
नुकतेच सोनालीने साडीमध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने सुंदर निळ्या रंगाची प्रिंटेड सिल्क साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सोनालीने परिधान केलेल्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या सुंदर फोटोंना सोनालीने ‘Saree Love’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया