-
घरात पाली असणे आणि त्या कीटक खाणे हे निसर्गाच्या दृष्टीने योग्य असले, तरी घरात पाल दिसणे अनेकांना अजिबात आवडत नाही. विषारी रासायनिक फवारण्यांऐवजी नैसर्गिक आणि सुगंधी वनस्पतींचा वापर करून तुम्ही पालींना घरापासून सहज दूर ठेवू शकता.
-
पुदिना : पुदिन्याचा तीव्र आणि रिफ्रेशिंग सुगंध आपल्याला आवडतो, पण पाल आणि इतर कीटकांना तो अजिबात सहन होत नाही.
-
पुदिन्याचे रोप खिडकीत किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावावे. किंवा पुदिन्याच्या पानांचा रस पाण्यात मिसळून स्प्रे म्हणूनही वापरू शकता.
-
तुळस : घराच्या खिडकीत किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप नक्की ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर राहतेच, शिवाय तुळशीच्या वासाने पालही जवळ येत नाही.
-
गवती चहा : गवती चहामध्ये सिट्रोनेला नावाचा घटक असतो. यातील लिंबासारखा तीव्र सुगंध पालींना दूर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतो.
-
रोझमेरी : रोझमेरीच्या पानांचा वास खूप तीव्र असतो. घरातून पाल आणि डास या दोघांनाही दूर ठेवण्यासाठी हे एक उत्तम रोप आहे.
-
लॅव्हेंडर : लॅव्हेंडरचा सुगंध माणसाच्या मनाला शांतता देतो; मात्र पाल, कोळी आणि डासांना पळवून लावतो.
-
ही झाडे घरात ठेवल्याने केवळ पालच पळून जात नाही, तर घरातील हवाही ताजी, शुद्ध आणि सुगंधी राहते.
विस्मरणाला विसरण्यासाठी मेंदू सक्षमतेची गरज