-
किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, दिग्दर्शिका व नृत्यांगना आहेत.
-
किशोरी यांनी नुकतेच त्यांचा मुलगा बॉबी विजबरोबर (Bobby Vij) पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी किशोरी यांनी हिरव्या रंगाची सुरेख बनारसी नऊवारी साडी नेसली आहे.
-
साडीबरोबरच किशोरी यांनी पारंपरिक दागिन्यांचा आणि नाकातील नथीचा खास साज केला आहे.
-
बॉबीने क्रीम रंगाचा डिझायनर कुर्ता-सूट परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
माय-लेकाच्या या खास फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा भरभरून वर्षाव केला आहे.
-
किशोरी यांचे पती दीपक बलराज विज (Deepak Balraj Vij) हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : किशोरी शहाणे/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया