-
‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत आरोही ही व्यक्तिरेखा साकारून अभिनेत्री कौमुदी वालोकर घराघरांत पोहोचली होती.
-
कौमुदी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती आपले विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
कौमुदीने नुकतेच आपल्या सोशल मीडिया हँडलवर निसर्गरम्य वातावरणातील काही अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
कौमुदीने नुकतेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील प्रसिद्ध सिक्वोया नॅशनल पार्क (Sequoia National Park) मधील निसर्गरम्य फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कौमुदीने लाल रंगाचा स्वेटर आणि ऑफ-व्हाइट पँट असा कॅज्युअल ट्रॅव्हल लूक परिधान करून सुंदर पोझ दिल्या आहेत.
-
ती निसर्गरम्य तलाव आणि हिरवळीच्या पार्श्वभूमीवर अगदी रिलॅक्स मूडमध्ये बसलेली पाहायला मिळत आहे.
-
कौमुदीचा हा निसर्गाच्या सान्निध्यातील रिलॅक्स आणि नॅचरल अवतार तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
निसर्गरम्य लोकेशनवर क्लिक केलेले हे कॅज्युअल फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: कौमुदी वालोकर/इन्स्टाग्राम)
“मला नाना नकोसे वाटतात, त्यांची वाईट बाजू मी पाहिली आहे”; डिंपल कपाडिया यांचे नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य