-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते .
-
सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सोनालीने तिच्या जोडीदाराला अत्यंत गोड शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टनर, नेहमीप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात आणि रोजच्या दगदगीपासून दूर हा दिवस साजरा करत आहोत.”
-
या फोटोंमध्ये सोनाली आणि तिचा कुणाल एका सुंदर आणि घनदाट जंगलात व निसर्गरम्य वातावरणात उभे असलेले दिसत आहेत.
-
पहिली छायाचित्रे एका हिरव्यागार जंगलातील असून, तिथे उंचच उंच झाडे आणि मातीचा रस्ता पाहायला मिळतो.
-
सोनालीने या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला अत्यंत सुंदर असा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे. तर कुणाल ने पांढऱ्या रंगाच्या कॅज्युअल शर्ट आणि शॉर्ट घातले आहे.
-
त्यांच्या या रोमँटिक आणि निसर्गाच्या कुशीतल्या वाढदिवसाच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त कसे? कमी किमतीतही कंपनीला नफा कसा मिळतो; जाणून घ्या बिझनेस स्ट्रॅटेजी