-
झी मराठीवरील ‘शुभ श्रावणी’ मालिका आपल्या रंजक वळणांमुळे सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
-
या मालिकेत श्रावणीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराजने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
वल्लरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती तिचे नवनवीन व स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर करीत असते.
-
नुकतेच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून खास ड्रेसमधील काही आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने अतिशय सुंदर असा गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. ड्रेसवर तिने घेतलेली आकर्षक नारंगी रंगाची ओढणी तिच्या लूकला अधिकच खुलवत आहे.
-
कानात नाजूक कर्णफुले आणि केसांचा सुंदर अंबाडा बांधून वल्लरीने आपला हा ट्रॅडिशनल लूक पूर्ण केला आहे.
-
हे मनमोहक फोटो शेअर करीत तिने ‘Happiness is a choice’ अशी साधी आणि सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा नवा अंदाज चाहत्यांना खूप आवडला असून, त्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया