-
वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) ही लोकप्रिय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री असून ती एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनादेखील आहे.
-
आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याने वैदेहीने मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सध्या वैदेहीच्या एका नव्या लूकने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
समोर आलेल्या फोटोंमध्ये वैदेही अबोली रंगाच्या सुंदर पैठणी साडीत दिसत आहे.
-
या पैठणी साडीवर वैदेहीने मोत्यांचे आकर्षक दागिने परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करत वैदेहीने “आनंद मिळवलेल्या गोष्टीत नसून, मिळालेल्या गोष्टीत समाधान मानण्यात असतो” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
वैदेहीने २०१० मध्ये महेश कोठारे यांच्या ‘वेड लावी जिवा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा